Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

मराठी रीती रिवाज- महाराष्ट्रातील सण, देवस्थाने, पूजा, आरत्या आणि बरीच माहिती

मराठी रीती रिवाज या जगाच्या पाठीवर, कुठल्याही ठिकाणचे लोकजीवन खुलून येण्यासाठी मुख्यत्वे करून त्या संस्कृती मधले सण, त्यांचे उत्सव यांचा खूपच मोठा वाटा आहे. दैनंदिन आयुष्य जगताना माणूस हा नेहमीच काहीतरी नवीन घडण्याची वाट पहात होता. माणसाच्या या सतत नाविन्याच्या आणि बदलाच्या ओढीने तो समारंभासाठी निमित्ते शोधत गेला.  त्या शोधातूनच सणवारांची निर्मिती झाली. हे सण, उत्सव नेहमीच सर्वाना एकत्र बांधून ठेवण्यात,  त्यातून एकात्मता साधण्यात खूपच  महत्वाचं कार्य करत आले आहे. आपल्या भारतात आपले सण,  उत्सव यांना खूपच महत्व आहे. आपली प्राचीन भारतीय संस्कृती हि नेहमीच अध्यात्माशी निगडित होती. भारतातील तेहतीस कोटी देव, त्यांच्याशी निगडीत असलेल्या पौराणिक कथा, निसर्गात सतत घडणारे बदल, ऋतुमान या सर्वांशी सांगड घालून विविध सणवार यांची निर्मिती झाली. जीवनाला अध्यात्म , भक्तिभावाचा स्पर्श देण्यासाठी सर्व सण उत्सवांना देवकल्पना , पौराणिक कथा-कल्पनांची जोड दिली गेली.  विशिष्ठ देवतेचं अधिष्ठान , श्रद्धा , भक्तिभाव , पूजा ,  व्रत ,   नैवेद्य इत्यादींची जोड दिल्यामुळे सण धार्मिक भावनेने ,   श्रद्धेने साजरे केले